अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

सिद्धार्थ ग्रंथालयातर्फे दिवाळी पहाट
पुणे : सिद्धार्थ ग्रंथालयातर्फे दिवाळीनिमित्त ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, यावेळी ‘रु. ४५० मध्ये वर्षभर दिवाळी अंक वाचा’ या योजनेचा आरंभही करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई उद्यानात आयोजित कार्यक्रमात गायक राहुल घोरपडे, स्वरप्रिया बेहेरे, भाग्यश्री अभ्यंकर, हेमंत वाळुजकर यांनी विविध हिंदी व मराठी गीते सादर केली. त्यांना विजय उपाध्ये, नीलेश श्रीखंडे, विलास क्षीरसागर, मंदार देव यांनी साथसंगत केली. सुमेधा दफ्तरदार यांनी निवेदन केले. या प्रसंगी आमदार सुनील कांबळे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक पवार आदी उपस्थित होते. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी स्वागत केले. तर ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी आभार मानले.

शब्दगांधार दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे : ‘‘दिवाळी अंकातील साहित्यातून संस्कारक्षम मने घडतात. सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या विषयांवर लिहिण्यास प्रवृत्त करणाऱ्या शब्दगांधार दिवाळी अंकासारख्या दिवाळी अंकाचे कार्य कौतुकास्पद आहे,’’ असे मत प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी नुकतेच व्यक्त केले. शब्दगांधार दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अंकाच्या संपादक चारूशीला बेलसरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरविंद नेरकर, ॲड. अनिल पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सीमा शिंदे, डॉ. गौरी नेरकर-चंड, रजनी धायगुडे, प्रीती कारगावकर, अंजली देशपांडे, डॉ. रमेश वझरकर आदी उपस्थित होते. नेहा हवेली यांनी सूत्रसंचालन केले.