नवीन सोरतापवाडीत टपाल कार्यालय सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन सोरतापवाडीत
टपाल कार्यालय सुरू
नवीन सोरतापवाडीत टपाल कार्यालय सुरू

नवीन सोरतापवाडीत टपाल कार्यालय सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः टपाल विभागाच्या वतीने नवीन सोरतापवाडी येथे शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले होते. पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. हवेली तालुक्यात पुणे ग्रामीण टपाल विभाग अंतर्गत हे डाकघर सुरू करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण पोपट एरंडे यांनी प्रस्तावनेत टपाल कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या पुणे शाखेचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षिरसागर यांनी डिजिटल सेवांची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश घुले, सरपंच संध्या चौधरी, सहायक अधीक्षक एस. डी. मोरे, दत्तात्रय वऱ्हाडी, गणेश वडूरकर आदी उपस्थित होते. उपसरपंच शंकर ज्ञानोबा कड यांनी आभार तर रेखा गोडघसे यांनी सूत्रसंचालन केले.