आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे पुण्यात शुक्रवारपासून आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे 
पुण्यात शुक्रवारपासून आयोजन
आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे पुण्यात शुक्रवारपासून आयोजन

आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे पुण्यात शुक्रवारपासून आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २ : सुहिंना सिंधी-पुणे आणि अलायन्स ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशन्स यांच्यातर्फे येत्या शुक्रवारपासून (ता. ४) २७ व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच हे संमेलन पुण्यात होत असून रविवारपर्यंत (ता. ६) कोरियंथन्स रिसॉर्ट अँड क्लब येथे संमेलन पार पडेल.

डॉ. पितांबर धलवानी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मनोहर फेरवानी, मोती मिलानी, रमेश छाब्रिया, राजीव कृषनानी, सुरेश रूपीजा आदी या वेळी उपस्थित होते. या संमेलनासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात विविध भारतीय सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच, ‘मिस इंडिया २०१३’च्या विजेच्या सिमरन आहुजा, भारताचे बुकिनो फासो येथील मानद राजदूत दीपक रामचंदानी, कांगो येथील मानद राजदूत रमन दासनानी, गिनी बिसाऊ येथील मानद राजदूत मोहन दुदानी, द रिपब्लिक ऑफ स्लोवॅनिया युगांडा येथील मानद राजदूत मीरा वदोदारिया आदी सहभागी होणार आहेत, असे डॉ. धलवानी यांनी सांगितले.