डेटा सायन्स विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा सायन्स विनामूल्य वेबिनार
डेटा सायन्स विनामूल्य वेबिनार

डेटा सायन्स विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

एपीजी
डेटा सायन्स विनामूल्य वेबिनार
पुणे, ता. २ : ‘डेटा’ हे इंटरनेट व आयटी आधारित जगाची ओळख व वैशिष्ट्य बनले आहे. डेटावर आधारित तथ्ये, सांख्यिकीय संख्या आणि ट्रेंडच्या आधारे आजचे बिझनेस लीडर्स महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. नव्या जगाचे हे परवलीचे तंत्रज्ञान नेमके काय आहे, डेटा सायन्स क्षेत्रातील करिअरसाठीचे मार्ग कोणते आहेत हे जाणून घेण्याची संधी वेबिनारमधून मिळणार आहेत. रविवारी (ता. ६) सकाळी आकरा वाजता वेबिनार होणार आहे. वेबिनारमध्ये डेटा सायन्स आणि बिग डेटा ओव्हरव्ह्यू, डेटा सायन्समध्ये करिअर घडवण्याची आघाडीची कारणे, सध्या डेटा सायन्समध्ये करिअर सुरू करणे किती महत्त्वाचे आहे? यासाठीची कुठल्या कौशल्यांची आवश्यकता आहे कुठल्या नाही?, जॉब स्किल मॅपिंग आदींबाबत डोमेन व इंडस्ट्री एक्स्पर्ट असणारे अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३
क्यूआर कोड : PNE22T02481

एसआयआयएलसी
शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूल कार्यशाळा
पुणे, ता. २ : शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमूना इ. शेतजमीन विषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा मंगळवारी (ता. ८) सकाळी साडेदहा ते साडेचार या वेळेत आयोजिली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाईन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी इ.बद्दल रियल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क रूपये २,५०० रुपये अधिक जीएसटी. कार्यशाळा मर्यादित ७५ जागांसाठी.
संपर्क ः ९३५६९७३४२७
क्यूआर कोड : PNE22T02481
ठिकाणः सकाळ मिडिया सेंटर, सकाळ नगर, बाणेर रोड, औंध, पुणे.