दिवाळी अंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंक
दिवाळी अंक

दिवाळी अंक

sakal_logo
By

लीड
-------
लहान मुलांसाठी दिवाळीचा सण खासच असतो. नवीन कपडे, फटाके, मनसोक्त सुट्ट्या यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आलेले असते. या आनंदात आता शब्दफराळही सहभागी झाला आहे. काही दिवाळी अंक मुलांसाठी प्रकाशित झालेले आहेत.

१) लाडोबा
अंकात काय असेल याची कल्पना नावातूनच येते. मुलांच्या अभिव्यक्तीला अंकाच्या माध्यमातून प्राधान्य दिले आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग अंकात केलेले आहेत. उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिवाजी तांबे, शिरीष देशमुख, संदीप वाकचौरे, पूजा देखणे, यासह विविध मान्यवर लेखकांच्या
बालकथा लक्षवेधक आहेत. या अंकाचे आणखी एक वैशिष्ठ्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीचे मुलांनी अभिवाचन केले असून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या ऐकताही येतात. यातून मुलांच्या कलागुणांना विशेष वाव दिला आहे. सुहास जगताप यांनी चितारलेले मुखपृष्ठ आणि आतील कथांमधील संतोष घोंगडे आणि आदित्य पराडकर यांचे रेखाचित्र वेधक आहेत.
संपादक ः घनश्याम पाटील
मूल्य ः २५० रूपये
पृष्ठे ः १००
----------------
२) धमालनगरी
या दिवाळी अंकात खुसखुशीत कविता, गोड गोड कथा आणि त्याला साजेशी खुमासदार आणि लक्ष वेधून चित्रे हे या अंकाचे वैशिष्ठ्ये आहे. शब्दरुपी फराळात एकनाथ आव्हाड यांच्यासह उमेश मोहिते, डॉ. दिलीप गरुड, बाळकृष्ण बाचल, मालती सेमले, राधिका भांडारकर, प्रज्ञा करडखेडकर, ज्योती देशपांडे यांच्या मुलांच्या मानसिकतेतून लिहिलेल्या गोष्टी वेध घेतात. मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उकल सर्व गोष्टींतून केलेली आहे. मुलांना काय अपेक्षित आहेत, याचा वेध घेऊन अंकाची मांडणी केली आहे. अंकाचे मुखपृष्ठ दिवाळीचा आनंद मिळवून देतो.
संपादक ः प्रा. रूपाली अवचरे
मूल्य ः ७० रूपये
पृष्ठे ः ४८
---------
३) बालसंवाद
मराठी साहित्य विश्वास बालवाङमयाचे स्थान महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन यंदाच्या अंकात विविध लेख, गोष्टींची मांडणी केलेली आहे. ल. म. कडू, राजीव तांबे, डॉ. श्रुती पानसे, भारत सासणे, आश्लेषा महाजन, जादूगार रघुवीर, किरण पुरंदरे, मोहन शेटे, डॉ. निलीमा गुंडी आदींचे लेख वेध घेणारे आहेत. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी चितारलेले चित्र वेध घेते. याबरोबर ज्येष्ठ गीतकार गुलजार यांची एक मच्छर भेटला ही कविता लक्षवेधक आहे. महाराष्ट्रातील दुर्गवैभवातून विविध किल्ल्यांची माहिती बालचमुंना भावणारी आहे. अंकातील कोडी मुलांना विचार करायला भाग पाडतात. हसतखेळत संवाद साधत, संवादातून शिकविणारा आणि शिक्षणातून समृद्ध करणारा यंदाचा दिवाळी अंक आहे.
संपादक ः सुनील महाजन
मूल्य ः २५० रुपये
पृष्ठे ः ११२
------
४) मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक
मनशक्तीच्यावतीने लहान मुलांसाठी विशेष दिवाळी अंक बालवाचकांसाठी आणला आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी चितारलेल्या मुखपृष्ठाद्वारेच अंकाचा वेध घेतला जातो. स्वामी विज्ञानानंद यांच्यासह ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी, प्रवीण दवणे, स्वाती राजे, संजीवनी बोकील यांच्या खुसखुशीत कथांबरोबर गणेश मतकरी, सुहास गुधाडे, गौरी लागू यांचे लेखही वेध घेतात. गुरू ठाकूर, दासू वैद्य, इंद्रजित भालेराव यांच्या कवितांनी अंकाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. प्रत्येक लेखातील नीलेश जाधव यांची चित्रे अप्रतिम झाली आहेत.
संपादक ः डॉ. वर्षा तोडमल
मूल्य ः ८० रुपये
पृष्ठे ः ६६
---------
पालकनीती
पालकत्वाला वाहिलेल्या ‘पालकनीती’ने यंदाच्या अंकात शांततेचा
शोध घेतलेला आहे. शांततेचा विचार मुलांच्या मनात बालवयापासून रुजणे गरजेचे आहे, ही मध्यवर्ती कल्पना घेऊन यंदाच्या अंकाची मांडणी केलेली आहे. अमन मदान, डॉ. माधुरी दीक्षित, जैन साही, प्रमोद मुजुमदार, सायली तामणे, उर्मी चंदा, अपर्णा देशपांडे यांसह विविध मान्यवरांचे लेख वेध घेऊन जातात. यंदाच्या अंकातील बहुतेक लेख शांततेचे महत्त्व पटवून देतात. अंकातील सर्व लेखांना चित्रकार रमाकांत धनोकर, भार्गवकुमार कुलकर्णी, प्रा. अनंत डेरे, मोहन देस यांची पूरक चित्र लेखातील आशय अधोरेखित करतात.
संपादक ः संजीवनी कुलकर्णी
मूल्य ः १५० रूपये
पृष्ठे ः १०८
----------