भारती विद्यापीठात प्राध्यापक विकास कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठात 
प्राध्यापक विकास कार्यक्रम
भारती विद्यापीठात प्राध्यापक विकास कार्यक्रम

भारती विद्यापीठात प्राध्यापक विकास कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) ट्रेनिंग अॅण्ड लर्निंग अॅकॅडमीच्या (अटल) सहयोगाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्‌घाटन सी-डॅकच्या संशोधन विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. एन. सुब्रमणियम यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. विदुला सोहोनी यांच्या उपस्थितीत झाले.

राष्ट्रीय पातळीवरील हा प्रशिक्षण कार्यक्रम ३१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुनीता धोत्रे यांनी उद्‌घाटन समारंभाचे प्रास्ताविक केले. डॉ. संदीप वांजळे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५० प्राध्यापक सहभागी झाले आहेत. या वेळी डॉ. एन. सुब्रमणियम म्हणाले, ‘‘डेटा वाढत असून त्यावर काम करणारी अॅप्लिकेशनदेखील डिजिटल डोमेनमध्ये वाढत आहेत. २०२५ पर्यंत डेटाची व्याप्ती १८० झिटा बाईटपर्यंत जाईल. या डेटाचे विश्लेषण करायला १५० ट्रिलियन गिगाबाईट रिअल टाइम डेटा लागेल आणि प्रचंड बुद्धिमत्तेची गरज लागेल. त्याची तयारी ठेवावी लागेल.’’ अशा प्रशिक्षण कार्यक्रमांतून ज्ञान वृद्धीचे काम होते. प्रचलित औद्योगिक आणि शैक्षणिक प्रवाहांची माहिती अद्ययावत करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग होतो. डेटा सायन्सबद्दल सखोल अभ्यास करण्यासाठीची दिशा या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार होईल, असा विश्वास डॉ. सोहोनी यांनी व्यक्त केला.