पीएमपीची ‘धाव’ आता शहरातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीची ‘धाव’ आता शहरातच
पीएमपीची ‘धाव’ आता शहरातच

पीएमपीची ‘धाव’ आता शहरातच

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः पीएमआरडीए क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी सुरु केलेले सुमारे ४० मार्ग पीएमपी प्रशासन बंद करणार आहे. तोट्यात असणाऱ्या या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असे. अखेर नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ते ४० मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामीण भागातील १४२ गाड्यांचे १२०० मार्ग बंद होत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीची सेवा सुरु झाल्यानंतरच पीएमपीची सेवा बंद केली जाणार आहे.
शहरातील प्रवाशांसाठी असलेली पीएमपीची बस सेवा ग्रामीण भागात सुरु केल्याने त्याचा विपरीत परिणाम शहरांतील सेवेवर होऊ लागला. त्यामुळे ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याची मागणी प्रवाशांतून होत होती. ती आता पूर्ण होत आहे. पीएमपी ४० मार्ग बंद करीत असून यात लोणावळा, रांजणगाव यांसारख्या लांब पल्ल्यांच्या मार्गांचा समावेश आहे. एसटीची सेवा सुरु झाल्यावर हे मार्ग बंद केले जाणार आहेत.

ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्प्याने याची अंमलबजावणी होईल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीने तिथे सेवा सुरु करावी, असे पत्र गुरुवारी देणार आहोत.
- दत्तात्रेय झेंडे,
मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे