राज्य सरकार गुजरातची चाकरी करते : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य सरकार गुजरातची
चाकरी करते : पाटील
राज्य सरकार गुजरातची चाकरी करते : पाटील

राज्य सरकार गुजरातची चाकरी करते : पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प गुजरातला जात आहेत. राज्यातले सरकार राज्याची सेवा करण्याऐवजी गुजरातची चाकरी करत आहे. विविध कंपन्यांचे प्रकल्प गुजरातला जात असतानाच भरती प्रक्रियाही रद्द करून राज्य सरकार राज्यातील लाखो युवकांना रोजगारापासून वंचित ठेवत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्य सरकारवर केली.

पोलिस भरतीवरील घातलेल्या बंदीसह विविध मागण्यासांठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शास्त्री रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘पोलिस भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. या सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र, त्यातही अडथळे आणले जात आहेत. माहितीच्या अधिकारात सध्या एका दिवसात माहिती मिळते. माहिती मागणाऱ्यानेच काय माहिती द्यायची हे लिहून दिलेले असते,’’ असा टोलाही पाटील यांनी शिंदे सरकारला लगावला.

मनोहर भिडे यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. त्याला भारतमातेची पुष्टी जोडणे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व महिला त्याचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती सत्तारूढ पक्ष जोपासतो आहे. भिडे यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी कधी त्यांना भेटायला गेलो नाही. माझ्या आईच्या निधनानंतर रक्षा विसर्जनप्रसंगी ते आले होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.