जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल
जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून २५ हजारांची रोकड व १६ मोबाईल जप्त करण्यात आले.
बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताडीवाला रोड परिसरात बेकायदा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती बुधवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यावेळी पथकाने छापा टाकत १७ जणांना ताब्यात घेत. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, हनमंत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.