कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा अटकेत
कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा अटकेत

कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : रस्त्यावर लावलेल्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १६ लॅपटॉप जप्त केले असून ४१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आकाश ऊर्फ विकास ऊर्फ विकी धरमपाल ठाकूर (वय ३४, रा. बालेवाडी, मुळ हरियाना) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सुशीलकुमार ऊर्फ बिंदू (रा. दिल्ली) याचा शोध घेण्यात येत आहे. ठाकूर याने चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरलेले लॅपटॉप असा आठ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान चतुःश्रुंगी मंदिराजवळील खाऊ गल्लीत एकजण स्वस्तात लॅपटॉप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून ठाकूरला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, ठाकूर हा पुण्यात पार्लरमध्ये हेअर आर्टिस्टचे काम करतो. चोरी केलेला सर्व माल दोन्ही आरोपी घेऊन विमानाने दिल्लीला घेऊन जात असे. चोरी केलेल्या बॅगमधील लॅपटॉप काढून घेत व इतर कागदपत्रे नदीत फेकून देत होते.