केंद्राने परवानगी नाकारल्याने प्रकल्प राज्याबाहेर : आबनावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राने परवानगी नाकारल्याने 
प्रकल्प राज्याबाहेर : आबनावे
केंद्राने परवानगी नाकारल्याने प्रकल्प राज्याबाहेर : आबनावे

केंद्राने परवानगी नाकारल्याने प्रकल्प राज्याबाहेर : आबनावे

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : केंद्र सरकारने मान्यता नाकारल्यानेच रायगडमधील बल्क ड्रग पार्क आणि औरंगाबादमध्ये प्रस्तावित असलेला वैद्यकीय उपकरणे बनविण्याचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरात व इतर राज्यांत जात आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रातील तरुणांना बसत असून, बेरोजगारी वाढत आहे. हे प्रकल्प कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर बाहेर गेले, परवानगी का नाकारण्यात आली याचा खुलासा केंद्र सरकारने केला पाहिजे, अशी मागणी आबनावे यांनी केली आहे.