...प्रसंगी ‘महानंद’चे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे दुग्धविकासमंत्री विखे पाटील : स्थिती खुपच बिकट असल्याची व्यक्त केली चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...प्रसंगी ‘महानंद’चे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे  
दुग्धविकासमंत्री विखे पाटील : स्थिती खुपच बिकट असल्याची व्यक्त केली चिंता
...प्रसंगी ‘महानंद’चे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे दुग्धविकासमंत्री विखे पाटील : स्थिती खुपच बिकट असल्याची व्यक्त केली चिंता

...प्रसंगी ‘महानंद’चे व्यवस्थापन राष्ट्रीय डेअरी बोर्डाकडे दुग्धविकासमंत्री विखे पाटील : स्थिती खुपच बिकट असल्याची व्यक्त केली चिंता

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची (महानंद) सध्या खुपच बिकट अवस्था झाली आहे. यामुळे संस्थेच्या सभासदांची देणी थकली आहेत. ही देणी देण्यासाठी राज्य सरकारकडून महानंदला तत्काळ दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. शिवाय या संस्थेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही काळ का होईना, महानंद ही संस्था चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) देण्याचा सरकारचा विचार असल्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी (ता. ३) सांगितले.

महानंद डेअरीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी या दूध संस्थेनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेशही त्यांनी या वेळी महानंदच्या अधिकाऱ्यांना दिला. महानंदच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने विखे-पाटील यांनी गुरुवारी पुण्यात याबाबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत शिपूरकर, पुणे प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ, महानंदचे महाव्यवस्थापक शैलेंद्र साठे, डेअरी व्यवस्थापक किरण ढवळे, एनडीडीबीचे प्रतिनिधी अनिल हारेकर आदींसह जिल्हा व तालुका दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुक्कुटपालकांच्या समस्यांसाठी समिती
राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन विखे-पाटील यांनी कुक्कुटपालक शेतकऱ्यांना दिले. या विषयावरील समस्यांसाठी त्यांनी गुरुवारी पुण्यात बैठक घेतली.

‘बैलगाडा शर्यतींबाबत
स्थानिक पातळीवर घ्या’
राज्यात सध्या गुरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे यंदा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करायचे की नाही, याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवरील लम्पीचा प्रादुर्भाव पाहून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतींबाबतच्या निर्णयाचा अधिकार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली.