स्वदेशी प्रदर्शन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वदेशी प्रदर्शन बातमी
स्वदेशी प्रदर्शन बातमी

स्वदेशी प्रदर्शन बातमी

sakal_logo
By

गो-कॉर्पतर्फे गो-स्वदेशी प्रदर्शन
पुणे, ता. ४ ः ‘गो-स्वदेशी’ हे गो-कॉर्प या संस्थेतर्फे आयोजित देशभरातील कलाकारांनी बनविलेल्या हातमागाच्या अस्सल वस्तूंचे प्रदर्शन पुण्यात सुरू आहे. हे प्रदर्शन सेनापती बापट रस्त्यावरील इंद्रप्रस्थ हॉल येथे भरले असून, ते रविवारपर्यंत (ता. ६) सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात हाताने व हातमागाच्या मदतीने बनविलेल्या वस्तूंच्या चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या लेटेस्ट डिझाइनच्या वस्तू खरेदी करता येतील. यात पारंपरिक व आधुनिक डिझाइनचा उत्तम मेळ घालण्यात आला असून, आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील कलाकारांनी बनवलेल्या वस्तू प्रदर्शनात विक्रीस उपलब्ध आहेत. यात पोचमपल्ली, संबलपुरी या साड्यांचाही समावेश आहे. कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, महिलांच्या वापराच्या वस्तू आणि दागिन्यांचे विविध पर्याय प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

छायाचित्र - 02837