देवदासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवदासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी
देवदासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी

देवदासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : समाजातील वंचित घटक असलेल्या देवदासींसाठी बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ येथील देवदासी वस्तीमध्ये भेटवस्तू दीपावली फराळ भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये तीनशे महिलांनी भाग घेतला. कार्यक्रमास स्थानिक नागरिक, व्यापारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. या वेळी भेटवस्तू आणि मिठाई वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी करून मानसन्मान दिल्याबद्दल देवदासी भगिनींनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन युगंधर कला-क्रीडा संघाचे अध्यक्ष बापू नाईक, सामाजिक कार्यकर्ते अजय खेडेकर, बाबासाहेब ढमढेरे, रोहिणी नाईक, पूनम सोंडकर, मारुती मादर, अनंता केंदुरकर, राहुल खेडेकर, राकेश शिलारखाने यांनी केले. तर, अलका गुंजनाळ यांनी आभार मानले.