अधिसभेच्या निवडणुकीस स्थगिती द्यावी ः मराठा महासंघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिसभेच्या निवडणुकीस स्थगिती द्यावी ः मराठा महासंघ
अधिसभेच्या निवडणुकीस स्थगिती द्यावी ः मराठा महासंघ

अधिसभेच्या निवडणुकीस स्थगिती द्यावी ः मराठा महासंघ

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः दिवाळीच्या सुट्यांमध्ये जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हाध्यक्ष रविराज काळे यांनी निवडणूक अधिकारी आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना निवेदन दिले. नवीन पदवीधरांना पदवीधर मतदार म्हणून नोंदणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ द्यावी, पुणे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या मतदारांना अधिसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी अशा मागण्या महासंघाने केल्या आहेत. उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, प्रमुख संघटक नीरज सुतार,अजय चव्हाण, रवींद्र जगताप यावेळी उपस्थित होते.