पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन
पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन

पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू ॲकॅडमीच्या वतीने पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. केंद्राचे उद्‌घाटन परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, चव्हाण करिअर ॲकॅडमीचे संचालक अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानी प्रशिक्षण, लेखी परीक्षेचा सराव, ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, सरावासाठी मैदान या गोष्टी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रसंगी विजयसिंह जेधे, डॉ. विलास पाटील, डॉ. सुदाम शेळके, डॉ. नवनाथ सरोदे, प्रा. गणेश मधे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दीपक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.