‘सवलतीच्या दरांत औषधोपचार मिळावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सवलतीच्या दरांत औषधोपचार मिळावेत’
‘सवलतीच्या दरांत औषधोपचार मिळावेत’

‘सवलतीच्या दरांत औषधोपचार मिळावेत’

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळातर्फे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास सेवा देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत असून, या सेवेबरोबर अशा ज्येष्ठ नागरिकांना सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांत सवलतीच्या दरात उपचार सेवा मिळावी, असे निवेदन अखिल भारतीय महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. सरकारी रुग्णालयांची संख्या कमी असून खासगी रुग्णालयांत औषधोपचारासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास समस्या उद्‍भवत आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरात ही सुविधा उपलब्ध व्हावी, अशी विनंती निवेदन पत्राद्वारे संघटनेचे अध्यक्ष महादेव मेंगे यांनी केली आहे.