महावितरणकडून साहित्याच्या दरसूचीमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणकडून साहित्याच्या दरसूचीमध्ये वाढ
महावितरणकडून साहित्याच्या दरसूचीमध्ये वाढ

महावितरणकडून साहित्याच्या दरसूचीमध्ये वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण तसेच पायाभूत सुविधा उभारणीची कामे महावितरणाला करावी लागतात. या कामांसाठी लागणाऱ्या विविध तांत्रिक साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.
महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतात. या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत असते. मात्र, कोरोना महामारीच्या कालावधीनंतर आता विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सद्यःस्थितीत २०१९-२० या वर्षांची म्हणजे कोरोना महामारीच्या पूर्वीची दरसूची या कामासाठी लागू आहे.
त्यामुळे सध्या लागू असलेल्या दरसूचीमध्ये वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरून होत होती. महावितरणने दरसूची अद्ययावत करण्यासाठी एका समितीची स्थापना करून या समितीने दरसूचीमध्ये बदल करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर समितीने दरसूचीमध्ये सुचविलेल्या बदलास महावितरणच्या प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन दरसूची लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.