पुणे परिसरात गारठा कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिसरात गारठा कायम
पुणे परिसरात गारठा कायम

पुणे परिसरात गारठा कायम

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः शहर आणि परिसरात गारठा वाढू लागला आहे. किमान तापमानात चढ-उतार असला, तरी रात्री थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. तसेच, थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री काही ठिकाणी शेकोट्याही पेटत आहेत. ही स्थिती पुढील आठवडाभर अशीच कायम राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सध्या उत्तरेकडील हिमालयातील भागांमध्ये काही प्रमाणात होत असलेली बर्फवृष्टी, त्यामुळे या दिशेतून वाहणारे थंड वारे राज्यात येत आहेत. परिणामी, राज्यासह पुण्यातही गारठा जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान हे १५ अंशांच्या खाली नोंदले जात आहे, तर सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घटदेखील कायम आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. असे असले तरी नीचांकी तापमान १५ अंशांच्या खाली राहू शकते. त्यामुळे पुणेकरांना अशीच गारठ्याची अनुभूती होणार आहे.

राज्याची स्थिती पाहता कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या सर्वच भागांत नीचांकी तापमान १८ अंशांच्या खाली आहे. शुक्रवारी (ता. ४) राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे १२.९ अंश सेल्सिअस झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १-३ अंशांनी घट पाहायला मिळत आहे. कोकणात पारा २० अंशांच्यावर आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

येथे पारा १७ अंशांच्या खाली ः
पुणे ः १३
लोहगाव ः १५.६
जळगाव ः १५
महाबळेश्‍वर ः १५.३
नाशिक ः १२.९
औरंगाबाद ः १३.१
नांदेड ः १६
अमरावती ः १५.५
बुलडाणा ः १६.४
गोंदिया ः १६.२
नागपूर ः १५.८
वाशीम ः १६
वर्धा ः १६.६