कंत्राटी कामगारांना बोनसला तत्त्वतः मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगारांना बोनसला तत्त्वतः मान्यता
कंत्राटी कामगारांना बोनसला तत्त्वतः मान्यता

कंत्राटी कामगारांना बोनसला तत्त्वतः मान्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान व ८.३३ टक्के बोनस देण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर सुमारे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दिवाळीमध्ये महापालिकेने कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले. पण कंत्राटी कामगारांना काहीही मिळाले नव्हते. कंत्राटी कामगारांनाही कायद्याप्रमाणे ही रक्कम मिळणे आवश्‍यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले त असल्याने राष्ट्रीय मजदूर संघाने अनेकदा आंदोलन करून ही मागणी लावून धरली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली. पुणे महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, मुख्य लेखापाल उल्का कळसकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, एस. के. पळसे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कंत्राटी कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सारखेच काम करत आहे. कायम कामगारांना मात्र ८. ३३ टक्के बोनस व १९ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. याच पद्धतीने कंत्राटी कामगारांना ही मदत केली पाहिजे. कंत्राटी कामगार कायदा अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार बोनस व सानुग्रह अनुदान दिले पाहिजे असा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर डॉ. खेमनार यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्य सभेपुढे जाणार आहे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल.