महापालिकेत ४२ कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेत ४२ कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी
महापालिकेत ४२ कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी

महापालिकेत ४२ कोटींच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी

sakal_logo
By

पुणे,ता. ४ : विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या ४२ कोटींच्या कामांना महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्याच्या कामासाठी १९ कोटींचा खर्च येणार आहे,असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

हे रस्ते होणार दुरुस्ती
- विश्रांतवाडी - ५०९ चौक- विमानतळ - १९ कोटी
- पुणे नगर रोड रिसर्फेसिंग - १५ कोटी
- बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी ७ कोटी २५ लाख.
- ५०९ चौक ते नागपूर चाळ - १ कोटी