सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा
सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा

सरळ सेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीसाठी विविध संवर्गासाठी आॅनलाईन चाळणी परीक्षा १ आणि २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेची कार्यपद्धत, ठिकाण, तारीख, योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. विविध विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी (गट-अ), प्रशासकीय अधिकारी (गट-ब), सहाय्यक प्रशासन अधिकारी (गट-ब) या संवर्गाकरिता एकत्रितरीत्या चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तसेच, या परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे लोकसेवा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.