फिरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरकी
फिरकी

फिरकी

sakal_logo
By

फिरकी हे कौटुंबिक विनोदी वार्षिक अंक आहे. हलक्या फुलक्या विनोदातून वाचकाला हसविण्याचा प्रयत्न या अंकातून होताना दिसतो. या अंकात कथा, लेख, कविता, व्यंगचित्र, विनोद, चुटके, वात्रटिका यांचा समावेश आहे. प्रा. साईनाथ पाचारणे यांची ‘फुकट्याला नशीब धार्जिन’, सचिन बेंडभर यांची ‘पक्या’, सिद्धीर सिंह यांची ‘माझ्या ‘सौ’चे स्वयंवर’, रामकृष्ण अघोर यांची ‘हनिमून’, अनिल अभ्यंकर यांची ‘ऑनलाइन बायको शोधण्यात मन्या झाला चितपट’, मीरा अत्रे यांची ‘स्वयंपाक घराशिवाय घर’ या विनोदी कथा वाचकाला हसून लोटपोट करतात. शब्बीर जाऊद यांची ‘उठूनी सकाळी लवकर’, प्रा. सुभाषचंद्र ताटी यांची ‘ती आणि मी’, प्रभावती कुलकर्णी यांची ‘सोबत’, लक्ष्मीबाई दाभाडकर यांची ‘हाथ जोडते सूनबाई’, प्रशांत पनवेलकर यांची ‘सर्दी’, दादासाहेब सदोळकर यांची ‘पलायन’ आणि तुळशी बोबडे यांची ‘देशीच्याच द्वारी उभा आयुष्यभरी’ या कविता खिळवून ठेवतात. या अंकात प्रकाश वर्मा, महादेव साने, डॉ. सुभाष नाईक यांच्या व्यंगचित्रांचा तर, अरविंद बुधकर, श्रीकृष्ण जोशी, अंजली देशपांडे, डॉ. मोनिका मुळीक, आनंद देशमुख यांच्या विनोदांचा समावेश आहे. अंकाच्या शेवटी आरोग्यावर आधारित डॉ. अभिजित पळशीकर, डॉ. अभिजित वाहेगावकर, डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. मिलिंद पांडे यांचे लेख वाचायला मिळतात.


संस्थापक संपादक : विनोद कुलकर्णी
संपादक : गौरव कुलकर्णी
पृष्ठे : २१२
मूल्य : १५०