‘गणेश मंडळाचे कार्यकर्ते महत्त्वाची सेवा बजावतात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गणेश मंडळाचे कार्यकर्ते 
महत्त्वाची सेवा बजावतात’
‘गणेश मंडळाचे कार्यकर्ते महत्त्वाची सेवा बजावतात’

‘गणेश मंडळाचे कार्यकर्ते महत्त्वाची सेवा बजावतात’

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः ‘पुण्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे गणेशोत्सवातील काम वाखाणण्याजोगे आहे. ते गणेशोत्सवात महत्त्वाची सेवा बजावतात, त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे’, असे मत पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले.
स्टारविन्स ग्रुपतर्फे आयोजित कलाधिपती छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिरिष मोहिते, नितीन पंडित, निवृत्ती जाधव आदी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षा दीपा तावरे, राजाभाऊ टिकार, पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे, स्वरदा देवधर आदी उपस्थित होते. राज लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रणव तावरे यांनी आभार मानले.