अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

रेडझोन हद्दीचे नकाशे
प्रसिद्ध करण्याचे निर्देश

पुणे, ता. ६ ः पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रेडझोनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे घरे विक्री करण्यात अडचणी येत आहेत. तसेच, मालमत्तेवर कर्ज घेण्यात, जमीन विकसित करण्यात व जुन्या बांधकामांचा पुनर्विकास आदींच्या समस्या उद्भवत आहेत. या पार्श्‍वभूमिवर पिंपरी चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे नकाशे व सर्वे यांची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
-----------

संघटना व कार्यकर्त्यांचा सत्कार
पुणे, ता. ६ ः एनजीओ फेडरेशनच्या वतीने ५० विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात गरजूंना मदत करणाऱ्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाला कौतुकाची थाप देण्याच्या अनुषंगाने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रियाज मुल्ला, माजी नगरसेविका हसीना इनामदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी फिरोज शेख, पश्‍चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जुबेर रशीद खान उपस्थित होते.