पुणे-दानापूर विशेष रेल्वे धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-दानापूर विशेष रेल्वे धावणार
पुणे-दानापूर विशेष रेल्वे धावणार

पुणे-दानापूर विशेष रेल्वे धावणार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे-दानापूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. गाडी क्रमांक ०३२८८ ही पुण्याहून ९ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी दानापूरला पोचेन. तर गाडी क्रमांक ०३२८७ ही दानापूरहून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पोचेल. गाडीला दौंड कॉड लाईन, अहमदनगर, मनमाड-भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.