पुण्यातील गारठ्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील गारठ्यात वाढ
पुण्यातील गारठ्यात वाढ

पुण्यातील गारठ्यात वाढ

sakal_logo
By

पुण, ता. ५ ः पहाटेच्या वेळी पडणारी थंडी... त्यात काही ठिकाणी पसरणारे हलके धुके अशा वातावरणात पुणेकरांना हुडहुडी भरण्यास सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली असून पुढील आठवडाभर हे चित्र असेच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शहरात तीन दिवसांपासून किमान तापमान १३ अंशांच्या घरात असून रात्री व पहाटे जाणवणाऱ्या गारठ्यामुळे ऊबदार कपड्यांची गरज भासू लागली आहे. नीचांकी तापमान अद्याप २ अंकी असून शनिवारी शहरात १३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळाली. त्यात येत्या गुरुवारपर्यंत (ता. १०) शहरात किमान तापमानात काहीशी घट अपेक्षित आहे. तर शहरात किमान तापमान हे पुन्हा १२ अंशांपर्यंत घसरू शकते. त्यामुळे पुणेकरांना थंडीचा कडाका जाणवू शकतो.
राज्यातही बऱ्याच ठिकाणी नीचांकी तापमानात सरासरीपेक्षा घट नोंदली जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरले आहे. यातच नगरमध्ये सरासरीपेक्षा ५ अंशांनी पारा घसरला आहे. शनिवारी (ता. ५) राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नगर येथे ११.१ अंश सेल्सिअस इतकी झाली. राज्यातही थंडीची चाहूल लागली असून उत्तरेच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही अनुभूती होत आहे. दरम्यान राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.