समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेणे हीच श्रद्धांजली मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेणे हीच श्रद्धांजली
मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेणे हीच श्रद्धांजली मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेणे हीच श्रद्धांजली मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘समाजवादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजवादी पक्ष सत्तेत आणणे, हीच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’’ अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्र सेवा दल, युवक क्रांती दल अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विकास देशपांडे म्हणाले, ‘‘समाजवादी विचारांचा अध्याय लिहिण्याची कुवत असणारा नेता आपल्यातून गेला. यादव यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या विचारांचे वर्चस्व असतानाही त्यांनी समाजवादी विचारांची मोठी ताकद तयार केली. पुन्हा एकदा यादव यांच्या विचारांची जागृती करण्याची गरज आहे.’’ राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष समाजवाद पुढे न्यायचा असेल तर या विचारांचा इतिहास समजून घ्यायला हवा. समाजवादी विचार पुढे नेत असताना समाजवादी विचारांच्या पक्षाची सत्ता स्थापन होणे, हीच यादव यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’

नर्मदा बचाव आंदोलनाचे इब्राहिम खान म्हणाले, ‘‘यादव यांनी सर्वजातीय लोकांना एकत्रित घेऊन नेतृत्व तयार केले. असा नेता आगामी काळात होईल की नाही, हे सांगता येत नाही. सामाजिक न्याय हा समाजवादाचा पाया असून त्यादृष्टीने वाटचाल करणे हीच यादव यांना श्रद्धांजली असेल.’’ या वेळी राष्ट्र सेवा दलाचे संदेश दिवेकर, युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.