फाउंटन पेन दिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाउंटन पेन दिवस साजरा
फाउंटन पेन दिवस साजरा

फाउंटन पेन दिवस साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः ‘‘आजच्या डिजिटल जगात जेव्हा चांगले हस्ताक्षर दुर्मिळ होत चालले आहे, तेव्हा फाउंटन पेन ते पुन्हा मिळवण्यात मदत करू शकतात. या पेनाद्वारे लेखन करताना, जेव्हा तुमचे डोळे, मन आणि हात एकरूप होतात, तेव्हा एक सुंदर कलाकृती घडते’’, असे मत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नुकतेच व्यक्त केले.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फाऊंटन पेन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांढरे बोलत होते. यावेळी ‘व्हीनस ट्रेडर्स आणि रायटिंग वंडर्स’चे सुरेंद्र करमचंदानी, वास्तुविशारद यशवंत पिटकर, सिंबायोसिस महाविद्यालयाच्या डिझाईन विभागाचे प्रमुख मनोहर देसाई, ‘मॅग्ना कार्ता पेन्स’ चे भारत कांखरा व हार्दिक कांखरा आणि चिंटूकार चारुहास पंडित उपस्थित होते. यावेळी देसाई यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ स्वरूपातील ऐतिहासिक लेखन साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. करमचंदानी यांनी लवकरच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिग्नेचर पेन आणणार असल्याचे तसेच डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिव्हल आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.