भारतीय हवाईदलात अग्नीवीर भरती प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय हवाईदलात अग्नीवीर भरती प्रक्रिया
भारतीय हवाईदलात अग्नीवीर भरती प्रक्रिया

भारतीय हवाईदलात अग्नीवीर भरती प्रक्रिया

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः भारतीय हवाईदलात जाण्याची इच्छा असलेल्या तरुणांना एक संधी उपलब्ध होणार आहे. हवाईदलाच्या वतीने अग्नीवीर भरती प्रक्रियेंतर्गत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. ७) यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अग्नीवीर वायू भरती प्रक्रियेसाठी बारावी पास झालेल्या उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता दिली असून २१ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा देखील ठेवली आहे. त्यासाठी २७ जून २००२ ते २७ डिसेंबर २००५ दरम्यान जन्म असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ ते २३ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. दरम्यान हा कालावधी काही दिवसांचा ठेवण्यात आला असून ऑनलाइन नोंदणी न केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. लेखी, शारीरिक परीक्षा व वैद्यकीय तपासणी या टप्प्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.