मुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक
मुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक

मुंढवा नदीपात्रात आढळले मृतावस्थेतील अर्भक

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : खराडी येथील जुन्या मुंढवा पुलाच्या परिसरातील नदीच्या पात्राजवळ एका नवजात अर्भकाचा मृतदेह शनिवारी (ता. ५) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास नदीच्या बंधाऱ्यात या अर्भकाचा मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी याबाबत तत्काळ मुंढवा पोलिस व अग्निशामक दलास माहिती कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला त्याच्या मातापित्यांनी नदीत टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी शेगर करीत आहेत.