सिगारेटचे चटके देत पतीकडून पत्नीला तलाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिगारेटचे चटके देत पतीकडून पत्नीला तलाक
सिगारेटचे चटके देत पतीकडून पत्नीला तलाक

सिगारेटचे चटके देत पतीकडून पत्नीला तलाक

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक छळ करीत पतीने पत्नीला सिगारेटचे चटके देवून तिला तलाक दिल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली. या प्रकरणी पतीसह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फारुख शेख, शकावली शेख, शब्बीर शेख यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि फारुखचे नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासूनच फारुख व त्याचे कुटुंबीय फिर्यादी तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. दरम्यान, त्याने तिचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच पत्नीला घरात कोंडून कुलूप लावल्याचीही घटना घडली होती. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश शिळीमकर करीत आहेत.