मोबाईल हिसकावणाऱ्यांकडून रिक्षाचालकावर वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल हिसकावणाऱ्यांकडून रिक्षाचालकावर वार
मोबाईल हिसकावणाऱ्यांकडून रिक्षाचालकावर वार

मोबाईल हिसकावणाऱ्यांकडून रिक्षाचालकावर वार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांना विरोध केल्याने रिक्षाचालकावर चाकूने वार केल्याची घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

अक्षय चव्हाण (वय २८, रा. गांधीनगर, येरवडा) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. चव्हाण यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चव्हाण हे रिक्षाचालक आहेत. बुधवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चव्हाण त्यांच्या रिक्षातून एका प्रवाशाला घेऊन वाघोली येथून बाणेरला निघाले होते. त्यांची रिक्षा येरवडा येथील शास्त्रीनगर चौकातील सिग्नलला थांबली. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने रिक्षाचालक चव्हाण यांच्या खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत चव्हाण यांचा मोबाईल रिक्षात पडला. त्यानंतर त्यांनी रिक्षातून खाली उतरून चोरट्यास जाब विचारला. त्यावेळी त्याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीच्या पोटावर वार केले. त्यानंतर चोरटे पसार झाले. चव्हाण यांनी चोरट्यांचे वर्णन पोलिसांना दिले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी शास्त्रीनगर चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.