सैन्यदलाद्वारे नव्या गणवेशाची आयपीआर नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्यदलाद्वारे नव्या गणवेशाची आयपीआर नोंदणी
सैन्यदलाद्वारे नव्या गणवेशाची आयपीआर नोंदणी

सैन्यदलाद्वारे नव्या गणवेशाची आयपीआर नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः भारतीय सैन्यदलाच्या नवीन गणवेशाची डिझाईन आणि केमोफ्लाज पॅटर्नची ‘बौद्धिक संपदा हक्क’ (आयपीआर) अंतर्गत नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्कचे महानियंत्रक यांनी पूर्ण केली असून पेटंट कार्यालयाच्या अधिकृत जर्नलमध्ये याची क्रमांकासह नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता या गणवेशाचे डिझाईन आणि पॅटर्नचे आयपीआर पूर्णपणे सैन्यदलाला मिळाले असून सैन्यदलाद्वारे या डिझाईनचे विशेष अधिकार लागू करण्यात येऊ शकते.

सैन्यदलातील जवानांसाठी तयार केलेल्या नवीन डिजिटल पॅटर्न लढाऊ गणवेशाचे अनावरण भारतीय सैन्यदल दिनी केले होते. दरम्यान या नोंदीमुळे आता अधिकृत नसलेल्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे उत्पादन करणे बेकायदेशीर असेल. तसेच यासाठी त्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. या नव्या गणवेशाचे कापड वजनाने हलके परंतु मजबूत आहे. कापडाचे वैशिष्ट्ये पाहते ते जलद कोरडे होते आणि त्याची देखभालही सोपी आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्यांच्या गणवेशाचे वेगळेपण यातून दिसून येते. हे नविन गणवेश साकारण्यासाठी लष्करी टेलर यांना प्रशिक्षण दिले होते.
या नव्या गणवेशाचा वापर सुरू करण्याच्या अनुषंगाने लष्कराच्या कॅन्टीन स्टोअर विभागाद्वारे (सीएसडी) आधीच ५० हजार संच खरेदी करण्यात आले. तसेच खरेदी केलेले हे सर्व गणवेश १५ सीएसडी डेपोंना देण्यात आले. त्यामध्ये खडकी, मुंबई, अंबाला, लखनौ, दिमापूर, दिल्ली आदींचा समावेश आहे.