कलेच्या प्रशिक्षणाला अंत नाही ः डॉ. प्रवीण भोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलेच्या प्रशिक्षणाला अंत
नाही ः डॉ. प्रवीण भोळे
कलेच्या प्रशिक्षणाला अंत नाही ः डॉ. प्रवीण भोळे

कलेच्या प्रशिक्षणाला अंत नाही ः डॉ. प्रवीण भोळे

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः ‘‘गायन, वादन आणि नृत्य या कला प्रशिक्षणाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभिनेत्याकडे जन्मजात अभिनयाचे कलागुण असतात. त्यामुळे त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता नाही, असा समज आहे. कलेच्या प्रशिक्षणाला सुरुवात असते पण अंत नसतो’’, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी केले.
ललित कला केंद्र व नाट्यसंस्कार कला अकादमी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या अभिनय अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात डॉ. भोळे बोलत होते. या वेळी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड, स्पर्धेचे परिक्षक मिलिंद सबनीस, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी उपस्थित होते. अश्विनी आरे यांनी प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली. पुढील अभिनय वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात सांगितले. दीप्ती आसवडेकर यांनी आभार मांडले.
---------
‘नाट्यछटेत कमी शब्दात
कमाल आशयाची मांडणी’
‘लेखनाची बीजे अनेकांमध्ये दिसून आली. परंतु, नाट्यछटा कशी लिहिली जावी या विषयीचे तंत्र समजण्यासाठी कार्यशाळेची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन मिलिंद सबनीस यांनी केले. नाट्यछटा लेखन हे वाटते एवढे सोपे नाही. नाट्यछटा म्हणजे निबंध लेखन किंवा एकपात्री लेखन नाही. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दात कमाल आशयाची मांडणी होय, असेही त्यांनी सांगितले.