१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार
पुणे, ता. ७ : येथील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे ‘मंदिर जीर्णोद्धार शुभारंभा’चे आयोजन केले होते. आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल यांनी या जीर्णोद्धारासाठी मदत केली. या कार्यक्रमास आर्किटेक्ट शिरीष केंभावी, माजी न्यायाधीश अ‍ॅड. शरदराव मडके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट यांनी केले. यावेळी सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थानचे विश्वस्त संजय सातपुते यांनी केले तर, आभार विजय बहिरट यांनी मानले.
----------
कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी
पुणे, ता. ७ : दिवाळीतील सुंदर सजावट...आवडीची गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटणारी मुले... जादूचे कार्यक्रम आणि विविध खेळ खेळत केक कापण्याचा आनंद कॅन्सरग्रस्त मुलांनी लुटला. दिवाळी उत्सवाचा आनंद या चिमुकल्यांना मिळावा, यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. लायन्स क्लब पूना शिवाजीनगर यांच्यातर्फे भारती हॉस्पिटल व संशोधन केंद्र पुणे येथे ५० बाल कर्करुग्णांसाठी ‘दिवाळी सेलिब्रेशन विथ डिफरन्स’ उपक्रमांतर्गत दिवाळी उत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी नरेंद्र भंडारी, क्लबचे अध्यक्ष जीवन हेंद्रे, प्रकल्प समन्वयक विजया बांगड आणि विजय जाजू, मार्गदर्शक डॉ. ज्योती तोष्णीवाल आदी उपस्थित होते. भारती हॉस्पिटलच्या उपवैद्यकीय संचालक डॉ. अरुंधती पवार आणि कर्करोग-विशेषज्ञ डॉ. विभा बाफना यांचे सहकार्य उपक्रमाला मिळाले.