‘संकल्पना कोष’ चे शुक्रवारी प्रकाशन सरकार्यवाह होसबाळे व राज्यपाल कोश्यारी यांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संकल्पना कोष’ चे शुक्रवारी प्रकाशन

सरकार्यवाह होसबाळे व राज्यपाल कोश्यारी यांची उपस्थिती
‘संकल्पना कोष’ चे शुक्रवारी प्रकाशन सरकार्यवाह होसबाळे व राज्यपाल कोश्यारी यांची उपस्थिती

‘संकल्पना कोष’ चे शुक्रवारी प्रकाशन सरकार्यवाह होसबाळे व राज्यपाल कोश्यारी यांची उपस्थिती

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्चच्या (सी.आय.एस.आर) वतीने पुण्यात शुक्रवार (ता.११) नोव्हेंबर रोजी एकात्म मानव दर्शन संकल्पना कोष या पुस्तकाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते होणार आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती प्रा. अनिरुद्ध देशपांडे व संस्थेचे कार्यवाह हरिभाऊ मिरासदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनसंघाचे नेते आणि ‘एकात्म मानव दर्शना’चे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या पायावर विचारांची मांडणी केली. ‘एकात्म मानव दर्शन’ चा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यातील संकल्पनांचा नेमका अर्थ उलगडून दाखविण्याची गरज आहे. तसेच अनेक भारतीय शब्दांना इंग्रजीमध्ये नेमके प्रतिशब्द नाहीत. उदाहरणार्थ आत्मा, अहंकार, भाव, बुद्धी, धर्म, चित्त, गुरू, जीवात्मा. या शब्दांसाठी इंग्रजीमध्ये मांडणी करताना इंग्रजीमधील प्रचलित शब्दांचा वापर केला जातो आणि, त्यामुळे अनेकदा अर्थाचा अनर्थ होतो. या पार्श्वभूमीवर, सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च या संस्थेने अशा शब्दावलीचा संज्ञाकोश निर्माण केला. यासाठी चार वर्षापासून प्रयत्न सुरू होते. मुंबईच्या एकात्म प्रबोध मंडळाने रवींद्र महाजन व नाना लेले यांच्यासह देशभरातील तीस विद्वानांनी अथक मेहनत घेतली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.