जलोटा, जावेद अली यांना राम कदम कलागौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलोटा, जावेद अली यांना
राम कदम कलागौरव पुरस्कार
जलोटा, जावेद अली यांना राम कदम कलागौरव पुरस्कार

जलोटा, जावेद अली यांना राम कदम कलागौरव पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाचा रौप्य महोत्सवानिमित्त यंदाचा ‘स्व. राम कदम कलागौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायक अनुप जलोटा आणि जावेद अली यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे चौदावे वर्ष असून २ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी विश्र्वस्त राहुल देशापांडे, संदीप राक्षे, सौरभ राक्षे, विवेक थिटे आदी उपस्थित होते. यावेळी खाबिया म्हणाले, ‘‘संगीतकार राम कदम यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे २००६ पासून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘राम कदम कलागौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. तर या वर्षी गायक जलोटा आणि जावेद यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.’’