सृजनवलय कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सृजनवलय कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा
सृजनवलय कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा

सृजनवलय कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : संवेदना प्रकाशनाद्वारे प्रकाशित कवी अशोक भांबुरे यांच्या ‘सृजनवलय’ या कविता संग्रहाची प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गझलकार रमण रणदिवे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस तसेच कवी भांबुरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘ या कविता संग्रहातील कविता व गझल माणसावर भाळणारी आहे. यामध्ये चिंतनसुत्र, विचारसुत्र आहे.’’ प्रकाशन कार्यक्रमानंतर ‘सृजनवलय’ कविता संग्रहातील कवितांचे वाचन यावेळी केले. यावेळी भांबुरे यांनी मनोगत व्यक्त केले तर, धनंजय तडवळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद महाबळ यांनी केले.