राजगुरू संघाच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरू संघाच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन
राजगुरू संघाच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

राजगुरू संघाच्यावतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : येथील हुतात्मा राजगुरू संघ यांच्यावतीने देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘यशवंत निबंध स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून निबंधासाठी यशवंतराव चव्हाण यांचे औद्योगिक क्षेत्रातील योगदान, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण जीवन चरित्र हे तीन विषय दिले आहे. दरम्यान सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शुक्रवार (ता. १८) नोव्हेंबरपर्यंत निबंध जमा करण्याचे आवाहन हुतात्मा राजगुरू संघ अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कंधारे यांनी पत्रकाद्वारे दिली.