डीरडीओद्वारे सोनार प्रणालीची चाचणी-मूल्यमापन सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीरडीओद्वारे सोनार प्रणालीची 
चाचणी-मूल्यमापन सुविधा
डीरडीओद्वारे सोनार प्रणालीची चाचणी-मूल्यमापन सुविधा

डीरडीओद्वारे सोनार प्रणालीची चाचणी-मूल्यमापन सुविधा

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः संरक्षण संस्था आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने भारतीय नौदलासाठी उपयुक्त असलेल्या सोनार प्रणालीची अत्याधुनिक चाचणी आणि मूल्यमापन सुविधा उपलब्ध केली आहे. कोची येथील नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी (एनपीओएल) येथे सबमर्सिबल प्लॅटफॉर्मचे ध्वनिक वैशिष्ट्य आणि मूल्यमापनासाठी (स्पेस) ‘हल मॉड्यूल’ कार्यान्वित झाले आहे. जहाज, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टरसह विविध ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या सोनार प्रणालीची चाचणी आणि मूल्यमापन येथे केले जाणार.
या ‘स्पेस’ सुविधेची संकल्पना, डिझाईन एनपीओएलद्वारे तर निर्मिती चेन्नई येथील एल अँड टी शिपबिल्डिंगद्वारे करण्यात आली आहे. या ‘स्पेस’चा वापर मुख्यतः सोनार प्रणालीच्या मूल्यांकनासाठी केला जाईल. यामुळे सेन्सर्स आणि ट्रान्सड्यूसरची सुधारणा किंवा त्यांचा समावेश करणे अधिक सुलभ होईल. विशेष प्रकारची डिझाईन असलेले सबमर्सिबल प्लॅटफॉर्म हे या ‘स्पेस’ सुविधेचे वेगळेपण आहे. या प्लॅटफॉर्मची रचना आणि बांधकाम ही भारतीय शिपिंग नोंदणी आणि जहाज वर्गीकरण प्राधिकरणाच्या सर्व वैधानिक गरजा पूर्ण करते. तसेच यामुळे केरळ अंतर्देशीय जहाज नियमांनुसार तपासणी आणि नोंदणी निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाऊ शकते.