अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

संजीव कुमार यांच्या चरित्राचे वाचन सत्र
पुणे, ता. ९ : अभिनेते संजीव कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘संजीव कुमार - द अॅक्टर वुई ऑल लव्हड’ या त्यांच्या जीवनचरित्राचे विशेष वाचन सत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माध्यम व संज्ञापन विद्या विभागातर्फे आयोजित केले होते. यावेळी अभिनेत्री मानिनी डे व लेखिका रिता रामामूर्ती गुप्ता यांचा विभागातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रिता रामामूर्ती-गुप्ता म्हणाल्या, ‘‘कोणत्याही कलेच्या विद्यार्थ्यांना संजीव कुमार नेहमीच खास वाटतात. ते एक धाडसी व जोखीम घेणारे कलाकार होते. त्यांच्या प्रतिभेच्या सामर्थ्यामुळे त्यांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीही जिवंत आहे.’’ यावेळी विभाग प्रमुख माधवी रेड्डी तसेच डॉ. विश्राम ढोले आदी उपस्थित होते.
--------
‘नेव्हर माईंड’ नाटकाचे अभिवाचन
पुणे, ता. ९ : ‘निर्माण, पुणे’ निर्मित आणि विवेक बेळे लिखित ‘नेव्हर माईंड’ या खुमासदार दोन अंकी मराठी नाटकाचे अभिवाचन नुकतेच सेवासदन संस्थेच्या दिलासा शाळेच्या सभागृहात सादर झाले. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन लेले यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. त्यानंतर अभिवाचन सादर झाले. प्रेक्षकांची उपस्थिती आणि त्यांनी दिलेली दाद कलाकारांना प्रोत्साहित करत होती. या अभिवचनात मिलिंद कुलकर्णी, अर्चना शहाणे, मुग्धा किर्लोस्कर, दिलीप जोगळेकर सहभागी होते. डॉ. संगीता रामदासी यांनी निवेदन केले. डॉ. दीपा क्षीरसागर यांनी संगीत संयोजन केले. ‘नाटक तुमच्या घरी’ या अभिनव उपक्रमांतर्गत हा प्रयोग सादर केला. रोजच्या धावपळीत ज्यांना नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे शक्य
होत नाही, त्यांच्या घरी जाऊन अभिवचनाचा प्रयोग आम्ही सादर करतो, असे दिग्दर्शक मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.