पूर्ववैमनस्यातून तरुणास दांडक्‍याने जबर मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्ववैमनस्यातून तरुणास दांडक्‍याने जबर मारहाण
पूर्ववैमनस्यातून तरुणास दांडक्‍याने जबर मारहाण

पूर्ववैमनस्यातून तरुणास दांडक्‍याने जबर मारहाण

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः पूर्ववैमनस्यातून एकाने तरुणाला दांडक्‍याने जबर मारहाण करीत जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता.६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेत घडली. सागर भुजंग नायडू (वय २७, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाहरुख हंजगीकर (वय ३०) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी शाहरुख व त्यांचा मित्र विकास शिंदे हे दोघेही रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सागर नायडू हा हातात कोयता घेऊन तेथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरवात केली. कोयता हवेत फिरवून धमकी देत त्याने फिर्यादीस दांडक्‍याने जबर मारहाण केली. या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.