पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाकडून दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाकडून दहशत
पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाकडून दहशत

पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाकडून दहशत

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता.७) दुपारी चार वाजता हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात घडली.

बापू मकवाना (रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय भोसले (वय २७, रा. हडपसर) यांनी हडसपर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अक्षय भोसले हा त्याचा मित्र कृष्णा, भाऊ जाधव यांच्याशी सोमवारी दुपारी चार वाजता हडपसर येथील साडेसतरानळी पसिरसारत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या बापू मकवाना याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने अक्षयला शिवीगाळ करीत मी इथला भाई आहे, असे धमकावून त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये वाद वाढल्याने फिर्यादीच्या मित्रांनी बापूला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, त्याने कोयता उगारून व आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सी.सी. थोरबोले करीत आहेत.