--------- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

---------
---------

---------

sakal_logo
By

पोलिस-महापालिकेची ढकलाढकली ः वाहतूक कोंडीबद्दल ‘पीएमआरडीए’ला नोटीस

पुणेकरांना सोडले वाऱ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : शहरातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले असले तरी याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न पुढे येत आहे. आधी खड्डे, नंतर पोलिसांनी याचे खापर ‘बीआरटी’वर फोडल्यानंतर, आता महापालिकेने याच कारणासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाला (पीएमआरडीए) जबाबदार धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका, पोलिस प्रशसान व ‘पीएमआरडीए’मध्ये जबाबदारी ढकलण्यावरून जोरदार स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे कोंडीतील पुणेकरांना प्रशासनाने सध्या तरी वाऱ्यावर सोडल्यातच जमा आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बॅरीकेटींगमुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे कारण पुढे करीत महापालिकेने ‘पीएमआरडीए’ला कारवाई का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. एवढेच नव्हे, तर चार दिवसांत या संदर्भात खुलासा करावा, अशी तंबी भरली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपयोजना करण्याऐवजी एकमेकांवर ते ढकलण्याचे काम सुरू असल्याचे यावरून समोर आले आहे.