भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : भाजपच्या कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष आणि पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवार पेठेतील बढाई गल्लीत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश बालाजी बढाई (वय ३५, रा. धायरी) आणि दिनेश बालाजी बढाई (वय ३८, रा. निवृत्तीनगर, वडगाव पठार) अशी संशयितांची नावे आहेत. फिर्यादी शैलेश बढाई हे पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष असून, ट्रस्टमधील आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. शैलेश यांना पोटावर, छातीत मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत.