जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह
जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह

जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जगात प्रतिजैविक (ॲन्टिबायोटिक्स) प्रतिकाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक प्रतिजैविक जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहाच्या निमित्ताने प्रतिजैविकांच्या वापराबाबत जनजागृती केली जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठात या विषयावरील विविध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांचे या विषयातील ज्ञान विस्तारण्याची संधी मिळेल. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. करिश्मा परदेसी व समन्वयक डॉ. सुरेखा सातपुते यांनी सांगितले.