बॅंक फेडरेशनवर सहकार भारतीचे १२ उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंक फेडरेशनवर सहकार भारतीचे १२ उमेदवार
बॅंक फेडरेशनवर सहकार भारतीचे १२ उमेदवार

बॅंक फेडरेशनवर सहकार भारतीचे १२ उमेदवार

sakal_logo
By

पुणे, ता. १० :ः दि महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळत असून, सहकार भारती पुरस्कृत पॅनेलचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
फेडरेशनच्या २१ जागांवर सहकार भारतीने आपला पॅनेल उभा केला. फेडरेशनच्या २१ जागांसाठी ६१ उमेदवारांनी अर्ज केला असून, १२ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. आता उर्वरित नऊ जागांसाठी शनिवारी (ता. १२) मतदान होणार आहे. फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष आणि राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर आदी दिग्गजांनी अर्ज दाखल केले. सहकार भारतीच्या वतीने कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, सारस्वत को-ऑपरेटीव्ह बॅंकेचे संचालक किशोर रांगणेकर, अपना सहकारी बॅंक मुंबईचे संचालक दत्ताराम चाळके, एनकेजीएस बॅंकेचे संदीप प्रभू, ठाणे भारत को-ऑपरेटीव्ह बॅंकेचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी अर्ज भरला आहे. महिलांमध्ये सहकार भारतीच्या महिला प्रदेशाध्यक्षा व नाशिक जिल्हा महिला सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, जवाहर सहकारी बॅंकेच्या वैशाली आवाडे यांनी अर्ज भरले आहेत.