आयआयटी खरगपूरच्या स्प्रिंग फेस्टचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटी खरगपूरच्या स्प्रिंग फेस्टचे आयोजन
आयआयटी खरगपूरच्या स्प्रिंग फेस्टचे आयोजन

आयआयटी खरगपूरच्या स्प्रिंग फेस्टचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूरचा (आयआयटी) स्प्रिंग फेस्ट आता देशभरातील विविध शहरांत आयोजित करण्यात येणार आहे. आता त्याचे आयोजन कोलकता, भुवनेश्वर, पाटणा, रांची, गुवाहाटी, रायपूर या सहा शहरांमध्ये केले आहे.

पुण्यासह दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, भोपाळ, लखनौ, जयपूर आणि चंडीगड या ११ शहरांमध्ये देशव्यापी प्रीलिम्स झाले. या स्प्रिंग फेस्टमध्ये नृत्य, नाटक, संगीत, फॅशन आणि साहित्यिक इव्हेंटसाठी देशभरातील लोक सहभागी होतात. ११ प्रमुख शहरांमध्ये प्रीलिम्सचा यशस्वी आयोजनानंतर आता कोलकता, भुवनेश्वर, पाटणा, रांची, गुवाहाटी, रायपूर या आणखी सहा शहरांमध्ये नृत्य, नाटक, संगीत, फॅशन आणि साहित्यिक इव्हेंटसाठी एलिमिनेशन आयोजित करण्यास तयार आहोत. एलिमिनेशनमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी किंवा सांस्कृतिक अकादमी nwp.springfest.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. १२ शैलींतील १३० हून अधिक इव्हेंटमध्ये ३५ लाखांची रोख पारितोषिके स्पर्धक जिंकू शकतात. अधिक माहितीसाठी www.springfest.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.