रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन
रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन

रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १० : रोजगाराभिमुख विनामूल्य प्रशिक्षणाची नावनोंदणी सुरू करण्यात आली असून येत्या रविवारपर्यंत (ता. १३) ही नोंदणी खुली असेल. ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, अशा १८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींनी लवकरात लवकर सेंटरला भेट देऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
डॉ. नानासाहेब परुळेकर सकाळ चॅरिटेबल ट्रस्ट व टेक महिंद्रा फाउंडेशन यांच्या वतीने हा एक सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जीएसटी अकाउंट असिस्टंट आणि कला किंवा इतर शाखेच्या मुला-मुलींसाठी ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन हे प्रशिक्षण विनामूल्य घेतले जाते. या प्रशिक्षणांतर्गत इंग्रजी भाषेचे तसेच संगणक हाताळणीचे ज्ञानही दिले जाते. त्याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच रोजगार उपलब्धतेसाठी मदत पुरविली जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर भेट द्यावी किंवा संपर्क साधावा.
पत्ता- सुंदराबाई राऊत हॉस्पिटल, मामासाहेब मोहोळ स्कूलजवळ, केळेवाडी, कोथरूड, पुणे.
संपर्क क्रमांक ः ७४४७३०३१३४, ९६८९७३१५७०, ९७६७८५५९३२, ९०४९५४२७२५, ९९८७९६६९४५.